विहीरीच्या हिस्स्यावरुन चौघांना मारहाण; 14 जणांविरुद्ध गुन्हा

विहीरीच्या हिस्स्यावरुन चौघांना मारहाण; 14 जणांविरुद्ध गुन्हा

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील खळी येथील कांगणे कुटुबांतचं एका भावांने दुसर्‍या भावांकडे विहीरीचा हिस्सा मागितला, ही विहिर माझ्या क्षेत्रात असल्याने हिस्सा मिळणार नाही, असे म्हटल्याचा राग आल्याने झालेल्या मारहाणीत एकाच कुटुबांतील चार जण जखमी झाले तर 14 जणांविरुद्ध आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आश्वी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खळी येथील फिर्यादी गोरक्षनाथ किसन कांगणे हे गुरुवार दि. 27 जुलै 2023 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास गट नं 447 या आपल्या क्षेत्रात जनावरांच्या गोठ्याजवळ काम करत होते. दरम्यान बाबासाहेब किसन कांगणे, दिलीप बाबासाहेब कांगणे, शोभा दिलीप कांगणे, शैला बाबासाहेब कांगणे, सुभाष मुरलीधर कांगणे, मैना सुभाष कांगणे, जालिंदर सुभाष कांगणे, पोपट कारभारी कांगणे, सागर पोपट कांगणे, रामदास रघुनाथ कांगणे, प्रकाश विठ्ठल कांगणे, तेजस ज्ञानदेव कांगणे, रमेश राजाराम घुगे, अलकाबाई रमेश घुगे (रा. कांगणवाडी, खळी) हे सर्व जण समुहाने आले व सुभाष मुरलीधर कांगणे व बाबासाहेब किसन कांगणे यांनी गट नं 447 क्षेत्रातील असणार्‍या विहीरीत हिस्सा मागितला. हे क्षेत्र फिर्यादीचे असल्याने या विहिरीत हिस्सा मिळणार नाही, याचा राग आल्याने गोरक्षनाथ कांगणे यांच्यासह पत्नी ताराबाई, मुलगा विशाल व चैतन्य यांना शिवीगाळ व दमबाजी करत प्रकाश विठ्ठल कांगणे याने गजाने पायावर व सागर पोपट कांगणे याने डोक्यात काठीने गोरक्षनाथ कांगणे यांना मारहाण करत जखमी केले.

तर सुभाष मुरलीधर कांगणे यांनी गोरक्षनाथला जमिनीवर पाडून मारहाण केली. हे बघुन पत्नी व मुलांनी आरडा-ओरड केल्याने बाबासाहेब कांगणे यांनी ताराबाईच्या डोक्यात गज मारला तर विशाल व चैतन्य यांना रामदास कांगणे याने दगड मारुन व दिलीप कांगणे व सागर कांगणे यांनी लाथाबुक्यांनी मारुन जखमी केले. जर आमच्या विरोधात काही पोलिस केस केली तर एक-एकाचा बेत बघू अशी दमबाजी करुन शिवीगाळ केली. गोरक्षनाथ कांगणे, पत्नी ताराबाई कांगणे, मुलगा विशाल व चैतन्य हे जखमी झाल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

याबाबत प्रवरा रुग्णालयात जावून आश्वी पोलिसांनी गोरक्षनाथ कांगणे यांचा जबाब घेतला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 178/2023 भारतीय दंड संहिता 326, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलिस करत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com