
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या मद्यधुंद अवस्थेतील चौघांनी पोलीस अधीक्षक चौकात एका चारचाकी वाहन चालकाला मारहाण करून चारचाकीची काच फोडल्याची घटना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी कार (एमएच 20 बीवाय 7535) वरील चालक राहील खान (रा. मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्कॉर्पिओ (एमएच 12 एनई 3233) मधील चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस अधीक्षक चौकातून तारकपूरच्या दिशेने जात असताना स्कॉर्पिओमधील चौघांनी खाली उतरून, गाडी आडवी का लावली, असे म्हणत मारहाण केली. तसेच गाडीची काच फोडून, बोनेटचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.