अनोळखी व्यक्तींकडून एकास लोखंडी रॉडने मारहाण

अनोळखी व्यक्तींकडून एकास लोखंडी रॉडने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एकाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. उदय शंकरराव दरंदले (वय 47 रा. सोनानगर, सावेडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी (एमएच 16 बीएफ 5003) वरील दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी 10:15 वाजता बालिकाश्रम रोडवरील आर्यन गार्डन, सुडके मळा येथे ही घटना घडली. उदय दरंदले हे रविवारी सकाळी 10:15 वाजता आर्यन गार्डन येथील त्यांच्या गाळ्यात गेले असता तेथे दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. ते उदय यांना म्हणाले,‘तुम्ही येथे यायचे नाही,’ असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच त्यातील एकाने हातातील लोखंडी रॉडने उदय यांच्या डाव्या खांद्यावर तसेच हातावर मारहाण केली व पुन्हा येथे आला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक धिरज अभंग करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com