केडगावात तिघांना मारहाण

दोघांविरूध्द कोतवालीत गुन्हा
केडगावात तिघांना मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन जणांनी तिघांना मारहाण केल्याची घटना शहरातील केडगाव परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिव महाजन कुमार (वय 27, सध्या रा. इंडस्ट्रीयल एरिया, केडगाव, अहमदनगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

आरोपींमध्ये संग्राम रमेश गिते आणि येशोबा बाळू करर्डे (रा. केडगाव, अहमदनगर) यांचा समावेश आहे. फिर्यादी शिव महाजन कुमार हे सोमवारी रात्री सव्वादहाच्या दरम्यान त्यांच्या मित्रांसह जेवण बनवत होते. त्यावेळी आरोपी संग्राम गिते आणि येशोबा करर्डे त्याठिकाणी आले. आरोपींनी,‘तुमचे मालक कुठे गेले आहेत’, असे विचारले असता मालक बाहेर गावी गेले असल्याचे सांगितल्याने आरोपींनी त्याठिकाणी असलेल्या लोखंडी तव्याने मारहाण करण्यास सुरूवात केली.

मारहाणीत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक कुमार आणि शिव कुमार असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. कोतवाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.