घर खाली करण्यासाठी मारहाण

चौघांविरूध्द तोफखाना पोलिसात गुन्हा
घर खाली करण्यासाठी मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घर खाली करण्यासाठी महिलेचा विनयभंग करून दीराला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी नगर शहरात घडली. पीडित फिर्यादी महिलेने याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजू जग्गी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सिव्हिल हाडको), दोन अनोळखी पुरूष व एक महिलेविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी यांनी विकत घेतलेल्या घराचे रिन्युएशेनचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी तेथे फिर्यादीसह त्यांची जाऊ, सासू घरात असताना राजू जग्गी याने इतर दोन पुरूष व एक महिलेसह घरात घुसण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्यांना अडवले. त्यांचा त्यांना राग आल्याने त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत राजू जग्गी याने त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी नागरिक जमा झाले. जग्गी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या दिराला मारहाण करत,‘हे घर माझे आहे, तुम्ही ते लवकर खाली करा नाहीतर मी तुम्हा सगळ्यांना जीवे मारून टाकील’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com