मारहाण प्रकरणी एकास सक्तमजुरी

जिल्हा न्यायालयाचा निकाल
मारहाण प्रकरणी एकास सक्तमजुरी

अहमदनगर|Ahmedagar

दोघांना डोक्यात लोखंडी फावड्याने मारहाण (Beating) करून जखमी (Injured) केल्याप्रकरणी एकाला तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा (Punishment of hard) ठोठावली आहे. कालीदास बाबासाहेब बोडखे (वय 26 रा. पारगाव वाळुंज ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया (District Judge Mrs. M. A. Baralia) यांनी हा निकाल (Result) दिला.

29 मे 2018 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मिना भिवसेन घुले व तिचे पती भिवसेन घुले त्यांच्या मयत मुलीच्या मुलाला भेटण्यासाठी पारगाव वाळुंज (Pargav Valunj) येथे गेले होते. त्यावेळी ते त्यांच्या नातवाला, तु आमच्या बरोबर चल, असे म्हणाले असता कालीदास बोडखे याला राग आल्याने त्याने मिना व भिवसेन यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी मच्छिंद्र घुले यांनी हा वाद मिटविला होता. त्यानंतर मिना व भिवसेन हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले असता कालीदास याने भिवसेन व मच्छिंद्र यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून त्यांना जखमी केले.

याप्रकरणी मिना घुले यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) फिर्याद दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एम. के. क्षीरसागर (Sub-Inspector M. K. Kshirsagar) यांनी करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल (Chargesheet filed in court) केले. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी कालीदास बोडखे याला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अनिल डी. सरोदे यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.