लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन चारचाकी गाडीची मोडतोड

9 जणांवर गुन्हा दाखल
लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन चारचाकी गाडीची मोडतोड

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

गैरकायद्याची मंडळी जमवून लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली तसेच चारचाकी गाडी, लोखंडी टपर्‍या यांची मोडतोड (Car Debris) करुन नुकसान केल्याची गुन्हा नेवासाफाटा येथील 9 जणांवर दाखल झाला आहे.

लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन चारचाकी गाडीची मोडतोड
राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

याबाबत सत्यशील भाऊसाहेब घुले रा. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 30 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुकिंंदपूर गावातील बिगर शेती गट नं 80/3/3/1 मध्ये मी व माझे भाऊ असे आम्ही आमचे जागेतील टपर्‍याजवळ थांबलेलो असताना इसम संभाजी रामदास पठाडे, पंढरीनाथ रघुनाथ जाधव, किशोर श्रीधर गव्हाणे, बाळासाहेब साहेबराव ठोंबरे, संजय सोन्याबापू आगळे, तुकाराम कोल्हे, अमोल रामदास घोडके, प्रदीप राजगिरे, ज्ञानेश्वर शामराव मोटकर सर्व रा. नेवासा फाटा (मुकिंदपूर) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आम्हास लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) करून जखमी (Injured) केले तसेच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी (Threat) दिली. आमचे जागेतील चारचाकी गाडी, दोन लोखंडी टपर्‍या तसेच लोखंडी पोल तोडून फोडून अंदाजे दीड लाख रूपये किंमतीचे वस्तूचे नुकसान केले.

लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन चारचाकी गाडीची मोडतोड
नोकर पती- पत्नीने चोरले सव्वा तीन तोळ्याचे दागिने

या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) संभाजी रामदास पठाडे, पंढरीनाथ रघुनाथ जाधव, किशोर श्रीधर गव्हाणे, बाळासाहेब साहेबराव ठोंबरे, संजय सोन्याबापू आगळे, तुकाराम कोल्हे, अमोल रामदास घोडके, प्रदीप राजगिरे, ज्ञानेश्वर शामराव मोटकर सर्व रा. नेवासा फाटा (मुकिंदपूर) यांचेवर भारतीय दंड विधान कलम 143, 147, 149, 323, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन चारचाकी गाडीची मोडतोड
हैदराबादला जाण्याआधी तिघींपैकी एका मुलीवर नगरमध्ये अत्याचार
लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन चारचाकी गाडीची मोडतोड
अंगावर डिझेल ओतुन पेटवून घेण्याचा प्रयत्न !
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com