अल्पवयीन मुलाला मारहाण; महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरगेसह चौघांविरुद्ध गुन्हा
सार्वमत

अल्पवयीन मुलाला मारहाण; महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरगेसह चौघांविरुद्ध गुन्हा

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) - बोल्हेगाव परिसरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलास त्याच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे व या अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महापालिकाच्या अग्निशमन विभागात काही दिवसांपूर्वी कर्मचारी असलेल्या बोल्हेगाव येथील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला महापालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून अनुकंपा तत्वावर भरती केले आहे. या महिलेला एक मुलगा व एक मुलगी आहे. या महिलेच्या मुलाने आपल्या आईसह डॉ. बोरगे, मिसाळ व घाटविसावे हे रात्री घरी येऊन दारूची पार्टी करतात, धिंगाणा घालतात व मला मारहाण करून चटके देतात अशी व्यथा आधी पोलिसांकडे व नंतर चाईल्ड लाईनकडे मांडली होती. चाईल्ड लाईनने या मुलाचा जबाब नोंदवून तो रविवारी पोलिसांना सादर केला. यानुसार पोलिसांनी संबंधित मुलाच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506 तसेच बाल अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com