सात्रळ येथे मारहाणीत दोन जण गंभीर जखमी

पाचजणांवर गुन्हा दाखल ; दोन अटकेत, तिघे पसार
सात्रळ येथे मारहाणीत दोन जण गंभीर जखमी

राहुरी (प्रतिनिधी) / rahuri - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाला टिप देऊन छापा टाकायला लावला. या कारणावरून पाच जणांनी मिळून दोघा जणांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे घडली.

अंकित गोद आसावा रा. सोनगाव ता. राहुरी याने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 12 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी अंकित आसावा याला म्हणाले, तुम्ही आमची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाला टिप दिली आणि छापा टाकायला लावला. असे म्हणून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन हॉटेलमधील सामानाची तोडफोड केली. यामध्ये फिर्यादी अंकित गोद आसावा आणि योगेश अर्जुन गिते हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.

अंकित आसावा याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गिरन फकीरचंद तांबोळी, आदनान मिरन तांबोळी, पिरमोहंमद तांबोळी, सोनू उर्फ अरबाज पिरमोहंमद तांबोळी, शैयाज पिरमोहंमद तांबोळी सर्व रा. सात्रळ, ता. राहुरी या पाच जणांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ जायभाय करीत आहेत. या घटनेतील दोन आरोपी अटक केले असून बाकीचे पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com