मुठेवाडगाव येथील तुळशीराम महाराजांच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान

मुठेवाडगाव येथील तुळशीराम महाराजांच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - गेल्या दोन वर्षा पासुन कोविड महामारीमुळे या वर्षीचीही आषाढी पायी दिंडीची पंरपंरा खंडीत झाली असली तरीही श्रीक्षेत्र मुठेवाडगांव येथील संत तुळशीराम महाराज यांच्या पादूकांना चंद्रभागेत देवस्थानचे विश्‍वस्त बबनराव मुठे यांनी जलाभिषेक घातला.

संत तुळशीराम महाराज यांची मुठेवाडगांव येथील ग्रामस्थानी सुरु केलेल्या आषाढी पंढरपूरच्या पायी वारीने पंचवीसावे वर्ष ओलांडले आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भामुळे पायी दिंडी बंद आहे. त्यामुळे संत तुळशीराम देवस्थानचे विश्‍वस्त बबनराव मुठे यांनी स्वत: तुळशीराम महाराज यांच्या पादुका पंढरपूरला नेल्या. तेथे त्यांनी चंद्रभागेत स्नान करुन पादुकांना जलभिषेक घालुन पुजन केले. पादुका डोक्यावर ठेऊन त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या भोवती विठ्ठल नामच नामस्मरण करत प्रदक्षिणा घालुन आपली वारी पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले.

त्यानंतर तनपुरे महाराज यांच्या आश्रमात पादुकांचे पुजन झाले. राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना राज्य सरकारचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी महाराजांचा सत्कार केला. तर संत तुळशीराम महाराज यांच्या पंढपुरातील आश्रमात देखील पादूका पुजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पत्रकार बाळासाहेब भांड, अनिल पांडे, भाऊसाहेब काळे, गौरव सांळूके, राधाकृष्ण बोरकर उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com