
श्रीरामपूर |प्रनितिधी| Shrirampur
तालुक्यातील दीपक बर्डे हत्या प्रकरणातील महिला आरोपी सुलताना मजनु शेख हिला औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती वि. भा. कनकनवाडी व न्यायमूर्ती वाय. जी. खोबरागडे यांनी सबळ पुराव्याअभावी जामीन मंजूर केला.
सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी असे निरीक्षण केले की, सह आरोपीने पोलिसांसमोर केलेला खुलासा व घटनाक्रम हे न्यायाच्यादृष्टीने ग्राह्य धरता येणार नाही. कारण असे जबाब पोलीस कस्टडीत घेतलेले असतात. त्यामुळे अशा जबाबांवर पोलिसांचा दबाव असण्याची शक्यता असते. असे जबाब किंवा खुलासा न्यायालयात सिद्ध करायचे असतील तर तपासी अधिकारी यांनी तपास करत असताना अशा जबाबांना आधार देण्यासाठी मान्य असलेले पुरावे गोळा करावेत. तसेच या प्रकरणात गायब झालेल्या व्यक्तीचे शव मिळून आलेले नसल्याने त्याची हत्या झालेली असावी, असे ठामपणे सांगू शकत नाही.
याप्रकरणी श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अति गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने सदर आरोपीचा जामीन नाकारला होता. त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात अपिल करण्यात आले होते. याप्रकरणी सुरवातीपासून अॅड. जोऐब इकबाल शेख, अॅड. मोहसीन बी. पठाण व अॅड. अकिल एस. सय्यद यांनी काम पाहिले.