बारागाव नांदूर येथे होणार वन्यजीव उपचार केंद्र

1261.49 लाखांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
बारागाव नांदूर येथे होणार वन्यजीव उपचार केंद्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे ट्रांझीट ट्रीटमेंन्ट सेंटर (वन्यजीव उपचार केंद्र) उभारण्याच्या 1261.49 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्याने अखेर नगर जिल्ह्यातील पहिले ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वन्यप्राणी जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नगर जिल्ह्यात एकही वन्यप्राणी उपचार केंद्र नव्हते. त्यामुळे या प्राण्यांच्या औषधोपचारात अडचणी निर्माण होत होत्या. वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतात. अशा प्रसंगात त्यांना तातडीने उपचाराची आवश्यकता असते. मात्र, जिल्ह्यात कुठेही उपचार केंद्र नसल्याने वनविभागाच्या अडचणी वाढल्या होत्या. नगरमधील जखमी वन्यप्राण्यांची उपचारासाठी पुण्यातील कात्रजमधील उपचार केंद्रात रवानगी करावी लागते. बिबट्यांना उपचारासाठी बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात पाठवले जाते. पण त्यातही अनेक अडचणी येत होत्या.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com