सावेडीतून भरदुपारी दोन लाख लांबविले

लुटारूंनी अपघात करून घातली हुज्जत
सावेडीतून भरदुपारी दोन लाख लांबविले
Crime news

अहमदनगर|Ahmedagar

बँकेतून (Bank withdrawn Cash) काढलेले दोन लाख 15 हजार रूपये चारचाकी वाहनातून घेऊन जाताना दुचाकीवरील दोघांनी धडक दिली. वाहन चालकाशी हुज्जत घालून वाहनातील रक्कम असलेली बॅग (Bag) लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारी सावेडीत (Savedi) घडली.

नगर-मनमाड रस्त्यावर (Nagar-Manmad Road) सोमवारी दुपारी खासगी बँकेतून (Private Banks) एका व्यक्तीने दोन लाख 15 हजार रूपये काढले. ती रक्कम चारचाकीतून घेऊन जात असताना मनमाड रोडवर (Manmad Road) दुचाकीने धडक (Hit by a Bike) दिली. अपघात झाल्याने बाचाबाची सुरू झाली. दुचाकीवर दोघे होते. त्यातील एकाने वाहनातून रक्कम असलेली बॅग (Bag) काढली व दोघांनी पोबारा केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे (Deputy Superintendent of Police Vishal Dhume), तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Topkhana Police Station) पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी (PI Jyoti Gadkari) यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

तसेच आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. भरदिवसा चोरीचा (Thife) प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) ताब्यात घेतले असून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com