बँक कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप

File Photo
File Photo

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

बँकांच्या खाजगीकरणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध देशातील 10 कर्मचारी वर्गाची शिखर संघटना ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने आज 16 व 17 डिसेंबर 2021 रोजी दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.

हा संप ग्राहकांना जेरीस आणण्यासाठी नाही तर केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहचवण्यासाठी असल्याचे कर्मचारी संघटनांकडून सांगितले जात आहे. आपल्या जिल्ह्यातील सुद्धा सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज ठप्प होणार असून ग्राहकांनी सहकार्य करावे तसेच आमचे म्हणणे समजून घेऊन आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फडरेशनचे सुधाकर जोशी यांनी केले आहे.

बुडीत कर्ज, मोठे उद्योगपती यांच्याकडून बाकी असलेली वसुली सोडून केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने बँकांचा बळी देत असल्याचे नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईसचे केंद्रीय समिती सदस्य हर्षद पाबळकर यांनी सांगितले.

संपाच्या निमित्ताने संगमनेर व आजूबाजूच्या पाच तालुक्यांतील बँक कर्मचारी संगमनेर येथे एकत्र जमून मोटारसायकल रॅली व निदर्शने करणार आहेत, अशी माहिती स्टेट बँक ऑफिसर असोसिएशनचे वैभव कदम यांनी दिली. दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता संगमनेर साखर कारखाना येथून रॅलीला सुरूवात होईल, शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांवरून जाऊन स्टेट बँक, जाणता राजा मार्ग येथे रॅलीचा समारोप होऊन त्याचे रूपांतर सभेत होईल व तेथे कर्मचारी निदर्शने करतील.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com