बँक ग्राहक सेवा केंद्र संचालकाला जबर मारहाण

एका शिक्षकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बँक ग्राहक सेवा केंद्र संचालकाला जबर मारहाण

अकोले (प्रतिनिधी) - अकोले तालुक्यातील कोतूळ येथील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या सेवा केंद्र चालकास जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने कोतूळ गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कोतूळ येथे एका राष्ट्रीयकृत बँकेचे सेवा केंद्र चालवत असलेल्या धनंजय सुभाष बोराडे यास कोतूळ येथील भुजबळ हॉस्पीटलच्या बोळात प्रशांत गीते, त्यांचा भाऊ सचिन गिते, अक्षय लहानू खरात, मोहन सखाराम खरात, गणेश उर्फ बैल्या भिका खरात अशा पाच जणांनी बुधवारी सायं.5.30 ते 5.45 वाजेच्या दरम्यान जबर मारहाण केली आहे.

याबाबत अकोले पोलिसांत मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. कोतूळ येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवत असलेल्या धनंजय सुभाष बोराडे यांच्या बाबत फेसबुकवर काही आक्षेपार्ह मजकूर शिक्षक असलेल्या प्रशांत गिते यांनी टाकला.

या बाबत धनंजय बोराडे यांनी असे करू नका असे समजावले परंतु प्रशांत गीते यांनी त्यांचा भाऊ सचिन गिते व मोहन सखाराम खरात, तसेच अवैध धंदे प्रकरणी गुन्हे असलेला गणेश (बैल्या) खरात व इतर गुन्हा असलेला अक्षय लहानू खरात यांनी कोतूळ येथील भुजबळ हॉस्पीलच्या बोळात जबरी मारहाण केली आहे.

विशेष म्हणजे अकोले पोलिसांत संबंधितांपैकी काही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असून यातील काही आरोपी तडीपार यादीतील आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com