कृषी दिनीही मिळेना बळीराजाला युरिया

बफर साठा करून अडचण
कृषी दिनीही मिळेना बळीराजाला युरिया
युरिया खत

श्रीगोंदा (प्रतिनिधी) / Shrigonda - तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाने दडी मारली असली तरी झालेल्या पावसावर ज्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या अन पिके जोरदार आली त्याला शेतकरी विहिरी, बोअरवेल चे पाणी देत असताना पिकाच्या वाढीला आवश्यक असणारा युरिया मात्र श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना (farmers) मिळेनासा झाला असून शेतकरी दिनाच्या दिवशी ही युरिया मिळाला नाही. जिल्ह्यात युरियाचा बफर साठा (buffer stock of urea) असला तरी शेतकऱ्यांना युरिया मिळण्यात अडचणी आल्या आहेत.

अगोदरच डीएपी खतांच्या वाढलेल्या किंमत कमी केली असली तरी डीएपी खत सहज उपलब्ध होत नाही .त्यातच आता युरिया ही शेतकऱ्यांना मिळेनासा झाला आहे. इतर खतांच्या गोण्या घेतल्यास एखादी दुसरी गोणी युरिया मिळत होता. मात्र आता आठ दिवसापासून युरिया शेतकऱ्यांना मिळत नाही. जिल्हा प्रशासनाने युरिया चा बफर साठा केलेला असला तरी तो युरिया खत विक्रेत्यांना दुकानात विक्रीसाठी आणताना अडचण अधिक खर्चाची अडचण होणार आहे.ठरलेल्या किमती पेक्षा जास्त रकमेला युरिया विक्री करता येत नाही .यामुळे इतर खत घेतली तर युरिया दिला जात होता आता इतर खते घेऊन देखील युरिया विकत मिळत नाही .

जिल्हा कृषि अधीक्षक यांना खरीप हंगाम २०२१ साठी श्रीगोंदा तालुक्यातील संरक्षित (Buffer) युरिया खत साठा किरकोळ विक्रेत्यांनमार्फत शेतकऱ्यांना वितरीत करणेसाठी परवानगी द्यावी . श्रीगोंदा तालुक्यासाठी एकूण २५ ९ .६६ मे.टन युरिया खताचा बफर साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झाला आहे . GNFC - ११४.३१ मे.टन २. IFFCO- ९ ८.१० मे.टन ३. RCF ४७.२५ मे.टन , युरिया बफर साठा खुला करण्यासाठी पत्र दिले आहे.

पद्मनाभ म्हस्के,तालुका कृषी अधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com