
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बालिकाश्रम रोडवर भूतकरवाडी चौकातील पंक्चरचे दुकान तसेच कपड्याचे व चप्पलांचे दुकान कशाने तरी पेटविल्याने या दोन्ही दुकानातील चार लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. ही घटना 24 तारखेला घडली.
सुभाष गणपत साठे (रा. बुर्हाणनगर, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले की, 25 तारखेला सकाळी सहाच्या सुमारास कामगार मोहमंद शालम शेख (रा. सावेडी नाका) याने फोन करून सांगितले, आपले पंक्चरचे दुकान पेटलेले दिसत आहे. तुम्ही लवकर या, मी लगेच दुकानाकडे गेलो. त्यावेळी दुकान जळालेले दिसले. दुकानामधील सर्व साहित्य जळालेलेे दिसले.
तसेच दुकानाशेजारील सुट्टी पप्पु विधाते यांचे कपड्याचे व चप्पलांचे सूरज कलेक्शन दुकान देखील जळालेले दिसले. तेव्हा आमची खात्री झाली की, आमच्या दोघांचे दुकान कशाने तरी पेटवून आमच्या दुकानातील साहित्य जळून नुकसान झाले आहे. माझे दोन लाख रूपयांचे तर सुट्टी विधाते यांचे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे साठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.