थोरात कारखान्याचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम दिशादर्शक - ना. थोरात

थोरात कारखान्याचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम दिशादर्शक - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या संकटात (crisis of Corona) महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी व पारदर्शक काम करताना सत्य आकडेवारी सांगितली आहे. याउलट ज्यांनी आकडेवारी लपवली त्या राज्यांचे मृतदेह गंगेच्या कडेला साचले होते. करोना हे संकट अद्याप संपलेले नाही. प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, या संकटाच्या काळात थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी काढले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (Oxygen production project) शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, जिल्हा बँकेचे (District Bank) उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, अमित पंडित, आर. बी. रहाणे, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, सौ. अर्चना बालोडे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, गणपतराव सांगळे, रामदास पा. वाघ, विष्णुपंत रहाटळ, साहेबराव गडाख, दत्तू खुळे, सुरेश झावरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते .

याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले, करोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी उपाययोजना करत काम केले आहे .या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. करोनाचे संकट अद्याप संपलेले नसून कोणीही हलगर्जीपणा करू नका. करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. टास्क फोर्सच्या मते तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे. यामध्ये राज्यात 50 लाख रुग्ण असू शकतात.त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसर्‍या लाटेमध्ये (second wave) निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे राज्य सरकारने (State Government) तीन हजार मेट्रिक टन ऑक्सीजन निर्मितीचे (Oxygen Production) उद्दिष्ट ठेवले असून यामध्ये राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांनी (Co-Operative Sugar Factory) सहभाग घेतला आहे. साखर कारखान्यांमधून थोरात कारखाना हा तिसरा ऑक्सिजन निर्मिती करणारा कारखाना ठरला आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले असून मागील करोना लाटेमध्ये 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करताना सर्व सहकारी संस्थांनी अत्यंत मदतीच्या भावनेतून काम केले.

आमदार डॉ. तांबे (MLA Sudhir Tambe) म्हणाले, करोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक तरुण मृत्यू पावले. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. तिसरी लाटेचा मोठा धोका असलेल्या प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याने (Thorat Co-oprative Sugar Factory) कायम मदतीच्या भावनेतून काम केले असून हवेत ऑक्सिजन निर्मितीच्या या प्रकल्पामुळे 100 रुग्णांचा (Patient) दिलासा दररोज मिळणार आहे. आगामी काळात मोठ्या खाजगी हॉस्पिटलने (Private Hospital) सुद्धा स्वत:चे ऑक्सीजन प्लांट निर्माण करावेत, असे आवाहनही त्यांनी केले .

याप्रसंगी सुरेश थोरात, सुभाष सांगळे, संचालक इंद्रजीत खेमनर, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, मीननाथ वरपे, अभिजित ढोले, संपतराव गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिक यादव, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, संतोष मांडेकर ,उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, सौदामिनी कान्हेरे रामदास तांबडे, किरण कानवडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com