करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करावे - ना. थोरात

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करावे - ना. थोरात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जावून आरोग्य सर्वेक्षण करुन करोनासदृश्य रुग्णांचे तातडीने विलगीकरण करावे. त्यासाठी शाळेत व्यवस्था करण्यासाठी सरपंच आणि पोलिस पाटलांनी प्रशासनाला मदत करावी.

तसेच खासगी डॉक्टरांनी आपल्याकडे आलेल्या संबधित रुग्णांची नोंद करुन प्रशासनाला माहिती द्यावी. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रातांधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. योगेश बंड उपस्थित होते.

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकाराने लॉकडाऊन लागू केला आहे. करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर महसूमंत्री थोरात यांनी आज आढावा घेत आरोग्य विभागासह महसूल व पोलिस प्रशासनाला सुचना दिल्या.

सध्या करोना तपासणी अहवाल प्राप्त होण्यास उशीर होत आहे. त्यामुळेे आरोग्य विभागाने घरोघरी जावून आरोग्य सर्वेक्षण करावे. त्यामुळे करोनासदृश्य रुग्ण कुटुंबापासून विलग करण्यास मदत होईल. गावातील शाळेसारख्या ठिकाणी करोनासदृश्य रुग्णांची व्यवस्था करावी. त्यासाठी सरपंच, पोलीस पाटील व शहरात नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा. खासगी रुग्णालयात आलेल्या रुग्णांची माहीती डॉक्टरांनी प्रशासनाला कळवावी.

मेडिकल चालकांनी डॉक्टरांच्या सुचनेशिवाय परस्पर गोळ्या-औषधे देवू नयेत. त्यामुळे सबंधीत रुग्ण सरकारी नोंदीवर येत नाही. नागरिकांनी त्रास होत असल्यास वैद्यकीय तपासणी करून कुटुंबापासून सुरक्षित ठिकाणी विलग राहावे. असे महसूलमंत्री थोरात यावेळी म्हणाले. यावेळी खासदार लोखंडे व आमदार कानडे यांनी विविध सुचना मांडल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com