करोनाचे कोणतेही लक्षणे दिसल्यास तातडीने विलीनीकरण करा - ना. थोरात

करोनाचे कोणतेही लक्षणे दिसल्यास तातडीने विलीनीकरण करा - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

सध्याची करोना लाट ही मोठी आहे. यामध्येही कोणीही निष्काळजीपणा करू नये. गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करताना घरोघर जाऊन प्रत्येकाची तपासणी करा. तापाचे काही लक्षणे आढळल्यास तातडीने त्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करावे अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी व प्रशासनाला केल्या आहेत.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगमनेर तालुक्यातील करोना परिस्थिती उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, जि. प. सभापती मीराताई शेटे, डॉ. हर्षल तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, विश्वासराव मुर्तडक, जि. प. सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, सिताराम राऊत, मिलिंद कानवडे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचोरीया, डॉ. राजकुमार जर्‍हाड, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.

नामदार थोरात म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये करोना चा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यासह प्रत्येक पदाधिकार्‍यांनी आपल्या विभागात व प्रभागात अधिक लक्ष देऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे. कोणत्याही कुटुंबांमध्ये एका व्यक्तीला तापाचे किंवा अन्य काही लक्षणे आढळल्यास त्याचे होम क्वारंटाईन बंद करून तातडीने संस्थात्मक विलीगीकरण करा. प्रशासनातील कर्मचार्‍यांनी घरोघर जाऊन तपासणी केली.

तर आपल्याला रुग्ण शोधता येतील. या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. घरातील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली असेल तर त्याची ट्रीटमेंट विलगीकरण करून तातडीने करा. जेणेकरून इतरांना त्याची बाधा होणार नाही. करोनाची रुग्ण संख्या करणे हेच अत्यंत आवश्यक आहे. राज्य पातळीवर आपण सातत्याने काम करत असून जिल्ह्यात करता व तालुक्या करता ऑक्सिजन व रेमडिसीवर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मार्ग निघत आहे. मात्र वाढणारी रुग्ण संख्या कमी करणे हेच मोठे आव्हान आहे. ज्या गावांमध्ये जास्त रुग्ण संख्या आहे तेथे पोलिस प्रशासनासह सर्वांनी अधिक दक्षतेने काम करा. गावच्या सर्व कर्मचार्‍यांना सोबत घेऊन पदाधिकार्‍यांनी नागरिकांच्या जागृतते बरोबर रुग्ण वाढ आपल्या गावात होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घ्यावी असे आवाहनही नामदार थोरात यांनी केले आहे.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, ज्यांना काही लक्षणे वाटत आहे त्यांनी स्वतःहून प्रशासनाला व गावातील कार्यकर्त्यांस माहिती द्या. जेणेकरून त्यावर तातडीने उपाययोजना करता येईल. करोना जागीच थांबवण्यासाठी स्वयंस्फूर्त महत्त्वाची आहे. आपण काळजी घेतली तर याची वाढ आपण रोखू शकणार आहोत. सर्वांनी या संकटामध्ये एकजुटीने लढायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुका करोना मुक्तीकडे आपल्याला न्यायचा आहे.

इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की ग्रामीण भागांमध्ये अजूनही जे काही कार्यक्रम होत आहेत ते तातडीने नागरिकांनी बंद करावेत. हे संकट एकावरील नसून आपल्या सर्वां वरील आहे . तेव्हा गर्दी काढणे हा एकमेव पर्याय आहे .

यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली तसेच तालुक्यामध्ये 988 शासकीय समित्या स्थापन झाले असून यामधून गावोगाव स्वयंस्फूर्तीने काम करणे गरजेचे आहे. यावेळी तहसीलदार अमोल निकम, डॉ. संदीप कचोरीया, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी विविध उपाययोजनांची माहिती दिली.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी सातत्याने प्रयत्न

सध्या करोणा रुग्ण वाढीमध्ये या रुग्णांकरिता ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा झाला असून तालुक्यातील व जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्याकरता आपण राज्य पातळीवरून प्रयत्न करत आहोत ही गरज कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे करोना रुग्ण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकार्‍याने आपल्या प्रभागात घरोघरची काळजी घ्या असे आवाहन नामदार थोरात यांनी केले.

घरोघर तपासणीवर भर

गावातील पदाधिकारी व शासकीय कर्मचारी यांनी घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करा कोणताही ताप असेल तर तातडीने त्याचे संस्थात्मक विलगीकरण करून त्याच्यावर उपचार करा म्हणजे आपल्याला करोनाची वाढ रोखता येईल अशी सूचना नामदार थोरात यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com