महसूल विभागाचे कामकाज देशातील इतर राज्यांसाठी अनुकरणीय ठरले- ना. थोरात

सात-बारासह फेरफार चतु:सीमा सर्व ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार
महसूल विभागाचे कामकाज देशातील इतर राज्यांसाठी अनुकरणीय ठरले- ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

महसूल विभागातील (Revenue Department) काम इन लाईन ऐवजी ऑनलाईन (online) करण्यासाठी आपण पुढाकार घेतला यामुळे नागरिकांना मोठी चांगली सुविधा मिळाली आहे. आगामी काळात सातबारा, ई-फेरफार, चतु:सीमा सर्वच ऑनलाइन पद्धतीने मिळणार असून अमृतवेल महाराष्ट्र डिजिटल सातबारा (Amritvel Maharashtra Digital Satbara) हा विशेषांक गौरवास्पद ठरणार असून राज्याच्या महसूल विभागाचे ऑनलाईन कामकाज हे देशातील इतर सर्व राज्यांसाठी अनुकरणीय ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केले.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज (Amrutvahini Engineering College) येथे ‘अमृतवेल’ च्या वतीने डिजिटल सातबारा या पुस्तकाचे प्रकाशन नामदार थोरात यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे (MLA DR. Sudhir Tambe), नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे (Durgatai Tambe), अमृतवेल मीडियाचे संपादक धर्मेंद्र पवार, राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Deputy Collector Ramdas Jagtap), प्रांताधिकारी शशिकात मंगरूळे (Shashikat Mangrule), तहसीलदार अमोल निकम (Amol Nikam), आदींसह पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले की, सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत महसूल विभागातील (Revenue Department) विविध कामे ऑनलाईन पद्धतीने केली गेली. यामुळे सातबारासह सर्व उतारे शेतकर्‍यांना (Farmers) मिळवणे सोपे झाले. आतापर्यंत दोन कोटी 53 लाख सातबारे हे ऑनलाईन (Online) झाले असून आगामी काळात सर्वच उतारे ऑनलाईन करण्यासह चतु:सीमा, फेरफार ही ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. महाराष्ट्राचे महसूल विभागाचे डिजिटल कामकाज हे राष्ट्रीय पातळीवर गौरवास्पद ठरले असून बाहेरील विविध राज्यांमधून अनेक महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी (Senior Officials of the Revenue Department) राज्याची काम करण्याची पद्धती अभ्यास करण्यासाठी येत आहेत. या नव्या डिजिटल सातबारा अंकाच्यामुळे एक नवी प्रणाली रूढ होत असून महसूल विभागाच्या या कामात सर्व वरिष्ठ अधिकारी ते तलाठी कोतवाल कर्मचारी या सर्वांचा मोठा सहभाग असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला हायटेक करण्याबरोबर देशात अव्वल बनवले आहे. देशातील सर्व राज्यांमधील चांगला महसूल विभाग कोणता तर महाराष्ट्राचा असा गौरवाने उल्लेख होत असून हे संगमनेर (Sangmner) तालुक्यासाठी सदैव अभिमानास्पद ठरत आहे. राज्य समन्वयक रामदास जगताप म्हणाले की, महसूल विभागाने आपले कामकाज संगणकीकृत केले, त्यानंतर ऑनलाईन केले व आता डिजिटल होत आहे. मागील पन्नास वर्षांमधील हे सर्वात ऐतिहासिक काम आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मेंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर तहसीलदार अमोल निकम यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com