‘त्यांच्या’ मनात सध्या नैराश्य दाटलेले

मंत्री थोरात यांचा आ.विखेंना टोला
‘त्यांच्या’ मनात सध्या नैराश्य दाटलेले
minister Thorat

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विरोधीपक्षाचे ज्येष्ठ आमदार असल्याने सध्या त्यांच्याकडे जी भूमिका आली ती पार पाडत आहेत. त्यांच्या मनात खूप नैराश्याची भावना असून त्याला वाट मोकळी करून देत असावेत, अशी खोचक टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे आ. राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील तिनही मंत्री कर्तव्यशून्य असल्याचा आरोप आ. विखे यांनी केला होता.

करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री थोरात नगरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री थोरात यांनी ऑक्सिजनवरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने आणि त्याअभावी रुग्णांचे जीव धोक्यात असतानाही विशाखापट्टणम येथून निघालेली ऑक्सिजन ट्रेन उशिरा महाराष्ट्रात दाखल झाली.

ही ट्रेन सुरतला गेली. मग तिकडून इकडे आली, असे का झाले हा संशोधनाचा विषय आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याबाबत त्यांना विचारले असता, गुन्हा व छापेमारी बद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसल्याने त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com