करोना काळात मोदींकडून लपवाछपवी

ना.थोरात : भाजपकडून धर्माचे नाव घेऊन राजकारण
करोना काळात मोदींकडून लपवाछपवी

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोना संकट (Corona crisis) काळात मोदींनी (PM Modi) लपवाछपवी केली. मात्र स्मशनाभूमीत अंत्यविधी पहावयास मिळाले. एक वर्ष शेतकर्‍यांनी कुंटुबासह थंडी वार्‍यात आंदोलन केले तेव्हा शेतकरी विरोधातील कायदे मागे घेतले. या आंदोलनात (farmers agigation) सातशे शेतकर्‍यांना जीव गमावण्याची वेळ आली, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी केली.

नगर (ahmednagar) तालुका काँग्रेस (congress) कार्यकर्त्यांचा मेळावा टाकळी काझी येथे बन्सी भाऊ म्हस्के विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले, आज काँग्रेस पक्ष कठीण परिस्थितीमधून जात असला तरी गरीबाच्या आयुष्यात जी काही सुधारणा झाली ती काँग्रेसमुळे झाली. आजच्या काळात धर्माचे नाव घेऊन राजकारण सुरू झाले आहे. धर्माच्या नावाने राजकारण करून सत्तेची पोळी भाजण्याचा प्रकार चालू आहे.

सात वर्षात मोदी सरकारने (modi govt) काय केले, नोटा बंदीचा काय फायदा झाला. गरीबाना लाईन त उभे केले काही ना जीव गमवावा लागला. सगळी अर्थव्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले. परदेशातून येणार कच्च तेल स्वस्त असताना महागात विकले, करोना संकट काळात मोदींनी लपवाछपवी केली. मात्र स्मशनाभूमीत अंत्यविधी पहावयास मिळाले. एक वर्ष शेतकर्‍यांनी कुंटुबासह थंडी वार्‍यात आंदोलन केले तेव्हा शेतकरी विरोधातील कायदे मागे घेतले. या आंदोलनात सातशे शेतकर्‍यांना जीव गमावण्याची वेळ आली.

नगर तालुक्यात स्व. दादा पाटील शेळके, स्व.बन्सी भाऊ म्हस्के या जुन्या माणसांनी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळली. काँग्रेस सर्वसामान्य माणसात जनतेत रूजवण्याचे काम केले. नगर तालुक्यातील काँग्रेस पक्षाला बळ देण्याचे काम केले. त्यांच्या नेतुत्वामुळे नगर तालुक्यातील काँग्रेस आज टिकून आहे. पक्ष वाढीसाठी आम्ही थोडे कमी पडलो. पक्षावरील निष्ठा हि शेळके, म्हस्के यांच्याकडून शिकली पाहिजे असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले .

या कार्यक्रमासाठी आ.लहू कानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सांळुके, बाळासाहेब हराळ, बाबासाहेब गुंजाळ, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, व्ही. डि. काळे, रावसाहेब शेळके, आबासाहेब कोकाटे, जयंत वाघ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com