महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज घेणार करोना आढावा

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज घेणार करोना आढावा
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर| प्रतिनिधी| Ahmednagar

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात शनिवारी अहमदनगर जिल्हा दौऱ्यात करोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. सकाळी नगर येथे जिल्हा आढावा घेतल्यानंतर ते पाथर्डी, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यात आढावा बैठका घेणार आहेत.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात शुक्रवारी विरार येथे घडलेल्या दुर्दैवी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते रात्री उशिरा संगमनेर येथे पोहोचले.

शनिवारी सकाळी १० वाजता मंत्री थोरात नगर शहरात येणार असून शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनासोबत कोविड परिस्थितीचा आढावा आणि उपायोजना बैठक घेणार आहेत. या बैठकीत आरोग्य सुविधांची स्थिती, तालुकानिहाय उपाययोजना आणि कडक निर्बंध अमलबजावणी आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

दुपारी १२ वाजता पाथर्डी, ३ वाजता शेवगाव आणि सायंकाळी ६ वाजता श्रीरामपूर येथे जाऊन करोना स्थितीचा आढावा मंत्री थोरात घेणार आहेत. मागील आठवड्यात मंत्री थोरात यांनी कोपरगाव, राहता, अकोले, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांत जाऊन आढावा बैठका घेतल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com