ना.थोरात व मी नेहमी अकोले-संगमनेरच्या हितासाठी राजकारणाचा उपयोग केला

...तर अगस्ति कारखाना उभा राहील नसता - माजी मंत्री पिचड
ना.थोरात व मी नेहमी अकोले-संगमनेरच्या हितासाठी राजकारणाचा उपयोग केला

अकोले l प्रतिनिधी

राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व मी नेहमी अकोले-संगमनेरच्या हितासाठी राजकारणाचा उपयोग केला आहे. आम्ही कधीही एकमेकांशी भांडलो नाही, ना.थोरात यांचे मुळे निळवंडे धरणाचे व कालव्याचे काम मार्गी लागले आहे. अगस्ति कारखान्यास संगमनेरने 'ना हरकत प्रमाणपत्र' दिले नसते तर अगस्ति कारखाना उभा राहील नसता असे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी सांगितले.

आज अकोले तालुक्यात पुरेसा आरोग्य सुविधा नसल्याने अकोलेच्या करोना रुग्ण संगमनेर येथे ऍडमिट होत आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व ना.बाळासाहेब थोरात यांचे अकोले तालुक्यासाठी मोठे योगदान आहे. अकोले-संगमनेर वादाची चुकीची प्रथा पाडू नका. असे आवाहन त्यांनी केले. प्रशासन अतिशय चांगले काम करीत असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहनही पिचड यांनी राजूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.

पिचड पुढे म्हणाले की-दुर्देवाने ज्यांच्यावर ही जबाबदारी जनतेने टाकली आहे, तेच ऐकमेकांबरोबर भांडत बसले असून आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. ज्यांच्यावर यांचा दबाव असायला हवा ते यांना जुमानत नाही असे चित्र एकीकडे असून दूसरीकडे जनता करोना महामारीत होरपळत आहे. करोनाचे राजकारण करु नका जनतेला मदतीचा हात द्या असा वडीलकीचा संदेश त्यांनी दिला.

Title Name
Video - चार तासांची खरेदी साधण्यासाठी नागरिकांची बाजारात गर्दी
ना.थोरात व मी नेहमी अकोले-संगमनेरच्या हितासाठी राजकारणाचा उपयोग केला

करोनाची अकोल्यातील स्थिती भयावट असून रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, रेमडीसीवर साठी रुग्णांचे नातेवाईक वण-वण भटकत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. आपल्या जवळच्या अनेक माणसांना करोनाने गाठले अन् आपल्यातून नेलेही. हे सर्व मला मनाला वेदना देणारे आहे. तालुक्यातील प्रत्येक माणूस हा माझा आहे, त्यांची दुख: सुख हे माझ आहे. अकोले तालुका हा अत्यंत संवेदनशील असून संकटकाळी सर्वजण एकत्र येवून लढाई करतात, ही तालुक्याची परंपरा आहे. आजही आणीबाणीची वेळ असून या संकटात तालुक्यातील प्रत्येक माणसाने या महामारीत प्रत्येकाला मदत करा, करोनाकडे अस्पृश्य भावनेने न पहाता त्याला सर्वांनी नियमांचे पालन करुन करोनाची दुसरे संकट परतवून लावा. असे आवाहन त्यांनी केले.

चाळीस वर्षांपूर्वीच्या अकोल्यात आदिवासी भागात एखादा आजारी पडला तर त्याला डोली करुन न्याव लागायच, रस्ते - पुल दळण वळणाची साधने नव्हती. आज या सर्व सुविधा असून चार मोठी ग्रामीण रुग्णालये, १० प्राथमिक आरोग्य केंद्र, ८० आरोग्य उपकेंद्र निर्माण केली. हे निर्माण करताना अत्यंत प्रतिकुल परिस्थिती होती पण अकोल्याची जनता जनार्दन माझ्या बरोबर होती. त्यामुळे मोठया आत्मविश्वासाने तालुकावर येणा­या प्रत्येक संकटाला परतवून लावू शकलो. आयुष्यभर संघर्ष आपल्या वाटयाला आला, परिणामांची चिंता न करता लोकांसाठी काम करीत राहिलो. आजही वयाच्या ८० व्या वर्षी लोकांसाठी काम करण्याची उर्मी ही लोकांमुळेच आपल्याला मिळते. परक्यांबरोबरच स्वकीयांनीही आपल्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीही डगमगलो नाही, घाबरलो नाही. असेही पिचड यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com