सर्व पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा देऊन लसीकरण करावे

सर्व पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा देऊन लसीकरण करावे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले निर्णय घेवून सामान्य माणसांना दिलासा दिला आहे. या सर्व संकट काळात राज्यातील विविध पत्रकार हे बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

म्हणून या सर्व पत्रकार बांधवांना फ्रन्टलाइन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावी अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते व महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात महसूल मंत्री नामदार थोरात म्हणाले की, कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे .यामध्ये सरकारने अत्यंत चांगले निर्णय घेऊन कोरोना रोखण्यासाठी प्रभावी काम केले आहे .याचबरोबर राज्यातील नागरिकांना मोफत लसीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या सर्व संकटकाळात राज्यातील विविध पत्रकार बांधव हे बातमीदारी करण्याच्या निमित्ताने सातत्याने घराबाहेर असतात आणि त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा जास्त धोका . यातून पत्रकारांचे कुटुंबातील सदस्यही मोठ्या प्रमाणात बाधित होऊ शकतात म्हणून रायातील सर्व पत्रकार बांधवांना फ्रन्टलाइन वर्कर चा दर्जा देऊन तातडीने लसीकरण करण्यात यावे.

पत्रकारिता ही समाज मनाचा आरसा असून संकटाच्या वेळी समाजासाठी पत्रकारांनी सातत्याने मोठे काम केले आहे .नागरिकांना धीर देत त्यांच्या समस्या मांडून सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहेत तसेच चांगल्या कामाचे ते सातत्याने पाठीशी उभे राहिले आहेत. मात्र धावपळीच्या जीवनामुळे अनेक पत्रकारांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे कुटुंबीयही सातत्याने काळजीत असतात.

आंध्र प्रदेश, तामिळनाडू ,मध्य प्रदेश, ओरिसा ,पश्चिम बंगाल या रायांमध्ये हे पत्रकारांचे लसीकरण करण्यात आले आहे .याच धर्तीवर महाराष्ट्रात ही तातडीने सर्व पत्रकार बंधूंच्या लसीकरण लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com