बाळासाहेब नाहाटांना अटक

गटविकास अधिकार्‍यावर बुट भिरकावला
बाळासाहेब नाहाटांना अटक

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrigonda

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत मधील अनियमित कामामध्ये ग्रामपंचायत सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर अपात्रेची कारवाई करणे संदर्भात प्रस्ताव का केला, अशी विचारणा करत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार समितीचे माजी सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांनी शिवीगाळ करत दमबाजी केली.

तसेच गटविकास अधिकारी काळे यांच्या वाहनावर बूट भिरकावला. सोमवारी दुपारी पंचायत समितीच्या कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गटविकास अधिकारी काळे यांच्या फिर्यादीवरून नाहाटा यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नाहाटा यांना अटक केली आहे.

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीतील विकास कामात अनेक अनियमितता असल्याची तक्रार लोणीव्यंकनाथ येथील एका नागरिकाने केली होती. त्या आधारे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी चौकशी अहवाल तयार केला आणि रामदास ठोंबरे यांच्यावर अपात्रेची कारवाई संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याची माहिती बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांना समजली असता ते सोमवार दुपारी श्रीगोंदा पंचायत समितीत आले.

ते काळे यांना म्हणाले, तुम्ही आमच्या सरपंचावर अपात्रेची कारवाई का करता, अशी विचारणा करताच दोघांची शाब्दिक चकमक झाली. नाहाटा यांनी काळे यांच्या अंगावर धावत शिवीगाळ करत दमबाजी केली. काळे यांच्या वाहनावर बुट फिरकविला. काळे यांनी लगेच श्रीगोंदा पोलिस ठाण्यात धाव घेत नाहाटा विरोधात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच श्रीगोंदा पोलीसांनी नाहाटा यांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com