बालमटाकळीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार

जागरूक ग्रामस्थांनी पकडला टेम्पो, रिकाम्या बारदाण्याच्या आडून प्रकार
बालमटाकळीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

शेवगाव पुरवठा विभागातील (Shevgaon Supply Department) गैरकारभार (Fraud) चव्हाट्यावर आला असतानाच आज तालुक्यातील बालमटाकळी (Balamtakali) येथे स्वस्त धान्य दुकानातील (Ration Shop) माल रिकाम्या बारदाण्याच्या वाहनातून काळ्याबाजारात विक्री (Black Market Sales) करण्यासाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. घटनेची माहिती शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे (Tahsildar Archana Pagire) यांना दिल्यानंतर नायब तहसिलदार व पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकानातील धान्य साठ्याचा पंचनामा केला.

याबाबत माहिती अशी की बालमटाकळी (Balamtakali) येथे स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे स्वस्त धान्य दुकान (Ration Shop)आहे. मंगरूळ येथील शिवाजी शंकर काकडे हे स्वस्त धान्य दुकान चालवीत आहेत. शनिवारी धान्य वाटप सुरू असताना ग्राहकांची दुपारी गर्दी कमी झाल्यानंतर दुकानदाराने एम एच 16 सीए 0604 क्रमांकाचा चारचाकी टेम्पो बोलावून त्यामध्ये रिकाम्या बारदाण्याचा भरणा केल्याचा बहाणा करून दुकानातील गहू तांदुळाचे 50 किलोचे पोते टेम्पोत टाकले. टेम्पो हे धान्य घेऊन जात असताना दिगंबर पोपळघट, अन्वर शेख, लक्ष्मण फाटे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी सिनेस्टाईलने रंगेहाथ पकडून सर्व प्रकारचा व्हिडीओ बनवला.

सदरची माहिती ग्रामस्थांना समजताच दुकानासमोर ग्रामस्थांनी मोठी गर्दी (Crowd) केली होती. याची माहिती दिगंबर पोपळघट यांच्यासह इतर युवकांनी शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर सुमारे दीड तासांनी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे, पुरवठा विभागाचे साळुंखे हे घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दुकानासमोर ग्रामस्थांनी तोबा गर्दी केली होती. आलेल्या संबंधित अधिकार्‍यांनी सदर घटनेचा ग्रामस्थांसमवेत पंचनामा केला असता स्वस्त धान्य दुकानात 50 किलोच्या 24 गोण्या आढळून आल्या.त्याचा दिगंबर टोके, परमेश्वर शिंदे,मधुकर पाटेकर, संदीप शिंदे, बाळासाहेब देवढे, या ग्रामस्थांच्या उपस्थित समक्ष पंचनामा करण्यात आला.

सदर दुकानदारांनी पॉश मशीनचा वापर न करता धान्याचे वाटप केले जात असून व ग्राहकांना धान्य दिले तर रीतसर पावत्या दिल्या जात नाहीत असा आरोप ग्रामस्थ शेखर बामदळे यांनी अधिकार्‍यांसमोर केला. दरम्यान पॉश मशीन (Posh machine) संबंधित अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये काय निष्पन्न होईल तसेच वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

गायब झालेले मशीन सापडले गोणीत

यावेळी स्वस्त धान्य दुकान चालक शिवाजी काकडे या दुकानदारांनी पॉश मशीन गायब केले व गावात नोंदणीसाठी पाठवले आहे अशी खोटी माहिती अधिकार्‍यांना दिली. अखेर ग्रामस्थांनी दुकानाची झडती घेतली असता. सदर पॉश मशीन दुकानदाराच्या जवळ असलेल्या गोणीत आढळून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com