कारागृहातून बोठेने केले 'यांना' कॉल

बोठेविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल
कारागृहातून बोठेने केले 'यांना' कॉल
बाळ बोठे

अहमदनगर|Ahmedagar

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे हा सध्या पारनेर उपकारागृहात असून त्या कारागृहात सापडलेल्या दोन मोबाईलमधून बोठेने वकिलांना फोन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

दोन ते तीन कॉल त्याने केल्याने त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मागील महिन्यात दोन आरोपीकडे दोन मोबाईल आढळून आले होते. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत आठ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

त्यांना गुन्ह्यात सहभागी करून घेतले असून आणखी काही आरोपींनी मोबाईलचा वापर केल्याचे समोर आले असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com