पारनेर |प्रतिनिधी| Parner

यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणार्या बाळ बोठे याच्या शनिवारी हैदराबाद येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर

रविवारी त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बोठेचे वकील व सरकारी वकील यांच्यात झालेल्या युक्तिवादानंतर पारनेर न्यायालयाच्या न्यायाधीश उमा बोर्हाडे यांनी बाळ बोठेला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पारनेर पोलीस स्टेशन ते न्यायालयापर्यंत बोठेला बेड्या घालून चालतच आणला होता. यावेळी पोलिसांचा मोठा गराडा होता.

जरे यांच्या बहुचर्चित हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला नगर पोलिसांनी हैदराबाद येथून काल (शनिवारी) पहाटेच्या सुमारास जेरबंद केले होते. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. हत्याकांडानंतर 102 दिवस बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात येऊनही बोठे सापडत नसल्याने पोलीस तपासाबाबतही साशंकता निर्माण झाली होती.

पारनेर न्यायालयांने त्याला फरार घोषित केले होते. येत्या 9 एप्रिलपर्यंत बोठे स्वतःहून हजर न झाल्यास त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला होता. नगरच्या पोलीस पथकाने शनिवारी पहाटे हैदराबाद येथून बोठे यास ताब्यात घेतल्यानंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये अटकेचे सोपस्कर पुर्ण झाल्यानंतर रविवारी दुपाारी बोठेला पारनेरच्या न्यायालयात हजर करणार आले.

त्याची पत्नी, मुले व काही नातेवाईक सकाळपासूनच पारनेर पोलिस स्टेशन व न्यायालयाच्या परिसरात हजर होते. मात्र, बोठे भोवती पोलिसांचा गराडा असल्याने त्याला कुटूंबियांना भेटता आले नाही. जरे यांचा मुलगा रुणाल हेही पारनेरला हजर होते. सर्व गोष्टींवर ते लक्ष ठेवून होते.