बाळ बोठेविरोधात आणखी एक दोषारोपपत्र दाखल

कारागृहात असताना वापरला होता मोबाईल || एकुण 15 आरोपींचा समावेश
बाळ बोठेविरोधात आणखी एक दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या (Yashwini Women Brigrade) अध्यक्षा रेखा जरे (President Rekha Jare) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे (accused Bal Bothe) याच्याविरूद्ध आणखी एक दोषारोपपत्र पारनेर येथील न्यायालयात दाखल (Chargesheet filed in the court at Parner) झाले आहे. रेखा जरे (Rekha Jare) यांच्या हत्याकांड प्रकरणी (Murder Case) अटक (Arrested) झालेल्या बोठेला (Bal Bothe) पारनेर (Parner) येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) ठेवण्यात आले आहे.

तेथे त्याने संपर्कासाठी मोबाईल वापरला (Mobile Use) होता. त्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात बोठेसह (Bal Bothe) 15 जणांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल (Chargesheet Filed) केल्याची माहिती पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप (Police Inspector Ghanshyam Balap of Parner Police Station) यांनी दिली. कारागृहात निषिध्द असलेल्या वस्तूचा वापर केल्याचा दोष ठेवत सुमारे 200 पानी दोषारोपपत्र दाखल केले असल्याचेही निरीक्षक बळप (Police Inspector Ghanshyam Balap of Parner Police Station) यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com