बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे संचलन

कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन
बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे संचलन

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - बकरी ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी नगर शहरातून संचलन केले. तसेच शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस कोतवालीचे निरीक्षक राकेश मानगावकर, तोफखान्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, भिंगारचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

सोमवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी संचलन केले. करोना संकटात बकरी ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी नियमांचे पालन करावे, तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कोविड निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचे पालन करून सण शांततेत साजरा करत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ढुमे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com