केक दिला नाही म्हणून बेकरी चालकाला मारहाण

सहा जणांविरोधात गुन्हा
केक दिला नाही म्हणून बेकरी चालकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केक दिला नाही म्हणून बेकरी चालकासह त्याच्या कुटुंबाला सहा जाणांनी मारहाण केली. सोमवारी रात्री बोल्हेगावच्या प्रेमभारतीनगरमध्ये ही घटना घडली. या मारहाणीत बेकरी चालक संतोष कैलास यादव (वय 35 रा. प्रेमभारतीनगर) हे जखमी झाले आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संकेत पोपट आढाव, अजित बाळासाहेब वाकडे, रहिम राजु शेख, धनंजय पवार, सुरज ऊर्फ बॉबी मांगडे, समीर (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील संकेत आढाव विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असून बॉबी मांगडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

सोमवारी रात्री संकेत आढाव व त्याचे इतर साथीदार संतोष यादव यांच्या बेकरीमध्ये गेेले. त्यांनी यादव यांच्याकडे केकची मागणी केली. केक शिल्लक नसल्याचे यादव यांनी त्यांना सांगितले. यानंतर आरोपींनी यादव यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी यादव यांची पत्नी व सासू मध्ये आल्यावर आरोपींनी त्यांनाही मारहाण केली.

आरोपींनी यादव यांच्या खिशातून 10 हजार रूपयांची रक्कम काढून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक गणेश चौधरी करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com