गोवंशाचा टेम्पो पकडून दिल्याने बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

पारनेर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा
File Photo
File Photo

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे बजरंग दलाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जनावरांनी भरलेला टेम्पो कर्जुले हर्या इथून पकडून तो टाकळी ढोकेश्वर पोलीस चौकीत आणून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यामुळे 6 जणांच्या टोळक्यांनी बजरंग दलाच्या 3 कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्फाक सादिक पठाण (रा.वडज, ता जुन्नर, जि. पुणे) शफिक शेख, फयाज शेख, सोहेल बुढण व हरित बुढण चौेघे (रा. बेल्हा, ता जुन्नर, जि.पुणे),े इसाक पूर्ण नाव माहित नाही (राहणार जुन्नर जि पुणे) अशी मारहाण करणार्‍या संशयितांची नावे आहेत. शुभम खंडू सूळ, अक्षय तुकाराम कारंड (रा.हांडेवाडा, वारणवाडी ता. पारनेर), अमोल सुरेश आंधळे (रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) अशी मारहाण झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. ते टेम्पो पकडून दिल्यानंतर स्कॉर्पिओ (नंबर एमएच 14 जे 1712) यामध्ये बसून गाडी पारनेर रोडला राधेश्याम फर्निचर दुकानासमोर गाडीत बसलेले असताना संशयितांनी अचानक येऊन लोखंडी रॉड लोखंडी गज व लाकडी काठीने स्कॉर्पिओ गाडीचे पुढील बाजूचे व दोन्ही बाजूच्या दरवाजाच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले.

तसेच दरवाजा उघडून अमोल सुरेश आंधळे तसेच त्यांच्या साथीदारांना मारहाण सुरू केली. यात आंधळे यांच्या डोक्यावर , सुळ यांच्या डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले. जाताना तुम्ही आमच्या जनावरांच्या गाड्या अडवता का पोलिसांना खबर देता काय आता वाचले परत आमच्या गाड्या अडवल्या व पोलिसांना काही माहिती दिली तर तुम्हाला सोडणार नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी शुभम खंडू सूळ यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com