बैल पोळा : बळीराजाच्या कामधेनुचा सण

बैल पोळा : बळीराजाच्या कामधेनुचा सण

यञिंकीकरणामुळे बैलची संख्या घटतेय ट्राँक्टरची संख्या वाढतेय

सुपा | वार्ताहार | Supa

श्रावण महीन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण समाप्ती आमावस्याला महाराष्ट्रात शेतकर्याचा जीवलग सखा बैलाविषयी कृत्यज्ञता व्यक्त करणारा सण साजरा करतात तो म्हणजे बैल पोळा .

वर्षीभर बळीराजाला पावलोपावली मदत करणाऱ्या बैलाविषयी ऋण व्यक्त करणारा दिवस म्हणजे बैल पोळा सपुर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रात श्रावणी व भाद्रपदी अशे एक महीन्याच्या अंतराने दोन बैल पोळे त्या त्या भागाच्या परंपरे प्रमाणे साजरे होतात. जास्त करुन श्रावणी पोळाच मोठा म्हणून जास्त भागात साजरा केला जातो. या दिवशी सकाळी बैलाना सुंगधी साबण लावून घासुन घुसून आंघोळ घातळी जाते नंतर त्याचे शिंगे साळली जातात त्यानंतर बैलाना बाजरीची भाकरी गुळाचा मलिदा खाऊ घातला जातो या दिवशी बैलाकडून काहीही काम करून घेतले जात नाही. दिवसभर रानात मोकळे चरायला सोडले जातात दुपारनतंर बैलाच्या सजावटीला सुरूवात होते. शिंगाना हिगोळ लावने. त्यावर बेंगड चिकटवणे बैलाच्या पाठीवर रंगाने नाव टाकने पुर्ण आंगभर टिपके देणे किंवा डिझाईन काढने वेसन,मोर्खी नवी घालने गळ्यात तोडा, घुंगरमाळ मण्याच्या माळा घालने शिंगाला गोंडें गजरे लावने, अंगावरती रंगीबेरंगी कपड्याच्या झुली घालने आदी प्रकाराने बैले सजवून वाजत गाजत गावातील मुख्य पेठानी फिरवत सर्व मंदीराचे दर्शन करतात तर काही गावानी बैल ( हटवने ) बसवण्याचा खेळ खेळला जातो, काही शेतकरी ऐपतीप्रमाणे अगदी डिजे लावून बैल मिरवतात. मिरवुन आणलावर गोठ्यामध्ये घरातील सुवासनीन घरधन्यासह या कामधेनुलाही आंक्ष्यन करतात व पुरणपोळी खाऊ घालतात एंकदरीत शेतकर्यासाठी व बैलासाठी बैलपोळा एक पर्वनी आसते .

काळानुसार शेतीत यांञीकीकरण वाढत चालल्याने व बैलाच्याही किंमत वाढत चालल्याने बैलाची संख्या झपाट्याने कमी होऊन ट्राँक्टरची संख्या वाढत आहे. बहुतांशी गावानी आता ट्राँक्टरची मिरवणूक व पुजा करु लागले आहेत. काळ कितीही बदलो कितीही यांञीक युग येओ परंतु बैलाशिवाय शेतकरी हे शब्द अपुरे आहेत.

Last updated

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com