महाविकास आघाडीने जखमेवर मीठ चोळले

महाविकास आघाडीने जखमेवर मीठ चोळले

ओबीसी आरक्षणप्रश्नी टीका; बसपाची संवाद यात्रा बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt) राजकीय आरक्षणासंबंधी (OBC Political Reservation) इतर मागासवर्गीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे (Bahujan Samaj Party) प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजने यांनी केला.

बहुजन समाज पार्टीच्या (BSP) संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची व बैठक झाली. यावेळी ते म्हणाले, ओबीसींची बोळवण करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेशाची शक्कल लढवली आहे. परंतु या अध्यादेशानंतर देखील ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या १० ते १२ टक्के जागा कमी होतील. ओबीसी आरक्षणावर हा तोडगा नसून समाजबांधवांची थट्टा असल्याचे ते म्हणाले.

प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश सचिव पंडित बोर्डे, वरिष्ठ नेते मुकुंद सोनोवणे, जिल्हा सचिव बाळासाहेब आव्हारे, संजय डहाणे, सुनील ओहळ, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष जीतू साठे, सुनील मगर, जिल्हा महासचिव मच्छिंद्र ढोकणे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण काकने, सचिव बाळासाहेब मधे आदी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक स्वराज संस्थेतील आरक्षणाचा प्रश्न अद्याप निकाली लागलेला नाही. अशात आंधप्रदेश आणि तेलंगणाच्या धर्तीवर ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत ओबीसी वर्गाला राजकीय आरक्षण देण्यासंबंधी अध्यादेश आणण्याची राज्य सरकारची तयारीत आहे. या मर्यादेनंतर ओबीसींची १० ते १२ टक्के जागा कमी होतील. परंतु ९० टक्के जागा वाचतील, असा सरकारचा दावा आहे. इतर मागासवर्गीयांचे फार नुकसान होवू दिले नाही, असा टेंभा सरकार मिरवतांना दिसून येत आहे. हा निर्णय केवळ फार्स असून ओबीसी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत असल्याचे ते म्हणाले.

माजी सनदी अधिकारी सुनिल शेजवळ यांनी बसपात प्रवेश केला. शेजवळ याच्यासह शेवगावचे प्रविण मगर, पद्माकर चव्हाण, धनंजय दिंडोरे, सुनिल देठे, बाळासाहेब श्रीराम, सुलेमान शेख, अजित भोसले यांनी बसपात प्रवेश करीत पक्ष संघटना मजबुत करण्याचा संकल्प केला.

Related Stories

No stories found.