खुडसगाव शिव रस्त्याची दुरावस्था, शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा

खुडसगाव शिव रस्त्याची दुरावस्था, शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा

आरडगांव (वार्ताहर)

राहुरी तालुक्यातील खुडसरगांव शिवारातील शिव रस्तांच्याची मोठी दुर्दशा झाली आहे. आता तर ऐन पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे मोठे जिकरीचे बनलय. अत्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याची दुरुस्ती न करता थेट नवीन रस्ताच तयार करावा अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

खुडसरगांव शिवरस्ता हा शेती पुरक दळणवळणासाठी अत्यंत महत्वाच आसल्याने या परीसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती देखील आहे. पाऊस झाल्यानंतर या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेती अवजारे शेती उपयोगी साहित्य शेतात नेणं हे तर मोठ आव्हानात्मक असते.

या रस्त्या अभावी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस देखील तोडी विना तसाचा अभा आहे. आमदार लहू कानडे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून देखील या समस्येकडे कोणीही दखल घेतली नाही. लोकप्रतिनिधींनी तात्काळ या समस्यांची दखल घेऊन हा रस्ता तयार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गणेश पवार, अप्पासाहेब पवार, अभिमन्यू निशाणे, सुभाष देठे, आबासाहेब पवार, सतिश पवार, ज्ञानेश्वर निशाणे, दादासाहेब निशाणे, प्रदिप पवार, परिगाबाई शेळके, मंदाकिनी शिंदे, भिमा निशाणे, मिनाबाई निशाणे, शांतीलाल देठे, बापुसाहेब पवार, सोपान निशाणे, पुंजाहरी देठे, दत्तात्रय देठे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com