अहमदनगर (प्रतिनिधी) - छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा मृत्यू नगरच्या ज्या किल्ल्यात झाला त्याची दुरावस्था झालीय. तुम्ही यावं, ते पहावं.. त्यातून किल्ला संवर्धनाचा प्रश्न तरी मार्गी लागेल .अशी गळ नगरचे साहित्यिक जयंत येलूलकर यांनी खासदार छत्रपती संभाजी राजे यांना घातली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वीय सहाय्यकास बोलावून नोंद करून ठेवा, नगरला जायचे असा शब्द दिला.नगरचा इतिहास जपला पाहिजे. ऐतिहासीक वास्तूचे जतन झाले पाहिजे यासाठी यंत येलूलकर हे कायमच दक्ष असतात. नगरमधील भूईकोट किल्ल्याची दुरावस्था झाली असून बुरूज केव्हाही कोसळेल, हे चित्र येलूलकर यांनीच जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे येलुलकर यांनी पुण्यात खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. या भेटीत भूईकोट किल्ला विषय चर्चेला आला. गतवर्षी मार्च महिन्यात गुढी पाडवा सांस्कृतिक महोत्सवास प्रमूख पाहुणे म्हणून येण्यास छत्रपती संभाजी राजेंनी होकार दिला होता. तेव्हा छत्रपती चौथे शिवाजीमहाराज समाधीस्थळ व भूईकोट किल्ल्यास भेट निश्चित झाली होती. यावर बोलताना छत्रपती म्हणाले, भूईकोट किल्ल्यात आमच्या पूर्वजांच्या स्मृती आहेत. छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा मृत्यू याच किल्ल्यात झाला. मी नक्की नगरला येईल. किल्ल्याच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेत असताना त्यांनी दिल्ली येथे संबंधीत अधिकार्यांशी चर्चा ही केली होती. नगरचे तत्कालीन कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्याशी दूरध्वनीवर बोलले होते. परंतु कोरोना संसर्गामुळे या भेटी होऊ शकल्या नाही. त्यामुळे येलुलकर यांनी पुणे भेटीत पुन्हा आग्रही विनंती करत नगरल यावं अशी गळ घातली. तुमच्या भेटीने या वास्तूच्या विकासात भर पडेल. त्याचे संवर्धन तरी होईल. नाहीतर या किल्ल्यांचे एक एक बुरुज केव्हा ढासळतील हे कळणार देखील नाही, अशी खंत येलुलकर यांनी मांडली. त्याची दखल घेज छत्रपतींनी लगेचच त्यांच्या स्वीय सहाय्यकास बोलावून घेतले. डायरीत नोंद करून ठेवा, नगरला जायचे अशी सूचना केल्याचे येलुलकर यांनी सांगितले. .............राजे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ते केंद्रीय पातळीवर प्रयत्न करीत आहेत. उद्याच्या पिढीला नगर शहराविषयी अभिमान वाटेल असेच काहीतरी छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीने घडेल याची खात्री आहे. म्हणूनच त्यांना नगरला आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. - जयंत येलुलकर, साहित्यिक.