खराब बर्फीची विक्री; अन्न प्रशासनाकडून कारवाई

File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील पाईपलाईन रोडवरील एका नामवंत मिठाई दुकानात खराब मलई बर्फीची विक्री केली जात असल्याची तक्रार अन्न प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने त्या मिठाई दुकानातून तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले आहे. शहरातील पाईपलाईन रोडवरील मिठाई दुकानातून एका व्यक्तीने बर्फी घेतली होती. त्या व्यक्तीच्या वडिलांना बर्फीपासून त्रास झाला.

बर्फी खाल्ल्यानंतर उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याने त्या दुकानदाराकडे याबाबत तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर दुकानदाराने अरेरावीची भाषा वापरली होती. मात्र याप्रकरणी अन्न प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी त्या मिठाई दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी बर्फीचे नमुने घेतले असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com