मागासवर्गीय फंडातील 15 टक्के वार्षिक निधी वितरीत करण्यात यावा

...अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा
मागासवर्गीय फंडातील 15 टक्के वार्षिक निधी वितरीत करण्यात यावा

बेलापूर |वार्ताहर| Belapur

बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून मागासवर्गीय फंडातील 15 टक्के निधी मागासवर्गीयांना रोख स्वरूपात वितरित करण्यात यावा अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

ग्राम विकास अधिकारी राजेंद्र तगरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2019-2020, 2020-2021 सालातील वार्षिक उत्पन्न अंदाजे 70 लाख असून, त्यानुसार दोन वर्षाचा दलित निधी सुमारे 14 लाख, दलित बांधवांना खर्च करणे अपेक्षित असताना तो खर्च केला नसून, दि. 27 मे 2021 च्या पत्राचा संदर्भ देत पुढे म्हटले आहे की, आपल्याकडे वेळोवेळी मागणी करून आपण कारवाई केलेली नाही. करोना सारख्या महामारीत गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सदर निधीतून सणासुदीला या काळात रोख स्वरूपात सर्वांना आर्थिक मदत करावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सदर निवेदनाच्या प्रती आमदार लहु कानडे, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद अहमदनगर, श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक आदींना पाठविण्यात आल्या आहेत.ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे यांना निवेदन देताना पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भरत साळुंके, अनिल पवार, जावेद शेख यांचेसह विजय शेलार, भाऊसाहेब तेलोरे, बाबासाहेब अमोलिक, विजय अमोलिक, विनोद अमोलिक, लुईस अमोलिक, दानियल खरात, गणेश अल्लाट लता तेलोरे, अनिता तेलोरे, उषा तेलोरे, प्रदीप शेलार, प्रसाद शेलार, सुभद्रा शेलार, रमेश शेलार, संजय शेलार, हिरण तेलोरे, सुशीला तेलोरे, सुंदर अमोलिक, सुनील जाधव, संदीप खरात, प्रकाश अमोलिक, राजेंद्र तेलोरे, सुनील अमोलिक, सचिन पारखे, नितीन खरात, मयूर खरात, महेश मिसाळ, वैशाली मिसाळ, जालिंदर मिसाळ, यशोदा मिसाळ, राहुल तेलोरे, नीलम तेलोरे, अनिता खरात, प्रकाश खरात, अशोक पवार, मंदा पवार, अजय पवार, विजय पवार, अमोल तेलोरे, पंकज रणदिवे, सनी पठारे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.