सातव्या टप्प्यात 17 बचत गटांना 17 लाख रुपये कर्जवाटप - ससाणे

आतापर्यंत 96 बचत गटांना 96 लाख रुपये कर्जाचे वाटप
सातव्या टप्प्यात 17 बचत गटांना 17 लाख रुपये कर्जवाटप - ससाणे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आजपर्यंत वाटप करण्यात आलेल्या कर्जातून महिलांनी मोठा व्यवसाय उभा केल्यास खरे समाधान मिळेल. परंतु त्यासाठी महिलांनी योग्य ते व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी केले.

श्री शक्ती ग्रुप श्रीरामपूर व जिल्हा बँक अहमदनगर ,शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या टप्प्यातील 17 जेएलजी महिला बचत गटांना 17 लक्ष रुपये कर्ज वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. आतापर्यंत 96 बचत गटांना 96 लक्ष रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आलेले असून भविष्यातही हे समाजकार्य चालूच ठेवणार असल्याचे करण ससाणे यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे म्हणाले, स्व. ससाणे यांच्या समाजकार्याचा वसा करण व दिपाली या उभयतांनी समर्थपणे चालवलेला असून, बचत गटाच्या मदतीने महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय उभारून स्वतःच्या पायावर उभे राहावे.

महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या सरचिटणीस दिपाली ससाणे म्हणाल्या, स्व. जयंतराव ससाणे यांचे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे स्वप्न स्त्री शक्ती या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करत असून त्यास राजश्रीताई आणि पती करण ससाणे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.

याप्रसंगी बाबासाहेब दिघे, आशिष धनवटे, श्याम आडांगळे, सुभाष तोरणे, प्रवीण नवले, राहुल बागुल, सरबजीत सिंग चूग,प्रसाद चौधरी, संतोष परदेशी, रितेश एडके, सनी मंडलिक, जावेद शेख, सुरेश ठुबे, वैभव पंडित, रियाज खान पठाण, युनुस पटेल, लक्ष्मण शिंदे, संजय साबळे, बाळसिंग टाक, जमील शेख, राजेश जोंधळे, गणेश काते, भागचंद धुळगंड, नजीर टेम्पोवाले, अमोल चिंतामणी, जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी पवार साहेब, कार्यालय प्रमुख खर्डे, शाखा अधिकारी अशोक पटारे, अशोक साळवे, श्रीमती चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com