
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील बाभुळवंडी गावातील डोंगराच्या कुशीतील अडवळणावर असणार्या बोरवाडीच्या करवंदे कुटुंबातील आठवीत शिकणारी कु.मनिषा गजानन करवंदे व सहावीत शिकणारा चि.श्रेयस गजानन करवंदे या बहिण भावाचा रंगपंचमीच्या दिवशी दुपारच्या सुमारास विहिरीत बुडुन अंत झाला होता, जि.प.च्या सदस्या सुनिताताई भांगरे यांनी करवंदे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
असं दुःख कुणाच्या ही वाट्याला येऊ नये.अतिशय हुशार व चाणाक्ष बहिण भावाचे जाणे हे आई वडिल,आजी आजोबा यांच्यासाठी खूप मोठी हाणी आहे..करवंदे कुटुंबाच्या दुःखात भांगरे परिवार सदैव खंबीरपणे उभा राहिला. जसे करवंदे परिवाराचे लेकरं तसेच मलाही ते माझ्याच लेकरांसाखे असल्याची भावना या वेळी सुनिताताई भांगरे यांनी व्यक्त केली. या वेळी लक्ष्मण म्हशाळ, रामनाथ लेंडे, पंढरीनाथ लेंडे,लहानु सदगीर, सुनिल भारमल सह ग्रामस्थ उपस्थित होते.