
बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar
राहाता तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्या बाभळेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सर्वच राजकीय उमेदवारांनी प्रचारात करोनाचे सर्व नियम पाळून आघाडी घेतली आहे. प्रत्येक उमेदवार रणरणत्या उन्हात घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे. हे सर्व करत असताना मात्र उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे.
बाभळेश्वर विविध कार्यकारी सोसायटीत जनसेवा मंडळ व सुजय दादा विखे मित्रमंडळ तसेच शिवसेनेत लढत होत आहे. 11 जागांसाठी 23 उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. सोसायटी 469 मतदार आहे. एकंदरित सर्व उमेदवार हे मतदारांशी संपर्क करीत आहे. वाड्या वस्तीवर उमेदवार मतदारांची गाठीभेटी घेऊन आश्वासने देत आहे. शेताच्या बांधावर जाऊन उमेदवार प्रचार करीत आहे. गावात डिजिटल बोर्ड नियम पाळून लावले जात आहे. बर्याचवेळा प्रचार करताना एकमेकाच्या विरोधात असणार्या उमेदवारांच्या समोरासमोर अनपेक्षित गाठी भेटी होताना दिसत आहेत.
बहुमताच्या आघाडीची जुळवाजुळव केली जात आहे. प्रत्येकाला गडा बरोबर सिंह सुद्धा निवडून आणावे. लागणार आहेत. बाभळेश्वर सोसायटीत म्हस्के, बेंद्रे, शिंदे, कोकाटे, खर्डे, आरगडे, कांदळकर, खोबरे, सोनवणे, अशा प्रमुख घराण्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकंदरित भाऊबंदकी व सगेसोयरे यात ही लढत रंगणार आहे. त्यामुळे गाव पुढार्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचारात रंगत वाढली असली तरी सिकंदर कोण होणार ? हे काळच ठरवणार आहे.