वीज तारांचे स्पार्किंग होऊन 4 एकर ऊस भस्मसात

लाखोंचे नुकसान
वीज तारांचे स्पार्किंग होऊन 4 एकर ऊस भस्मसात

लोहगाव |वार्ताहार| Lohgav

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) बाभळेश्वर बुद्रुक (Babhaleshwar) येथील वीज वितरण तारांच्या शॉर्टसर्किटमुळे (Power Distribution Wire Short Circuit) आग लागून 4 एकर ऊस (Sugarcane) त्याचबरोबर उसातील ठिबकही जळून खाक झाले.

वीज तारांचे स्पार्किंग होऊन 4 एकर ऊस भस्मसात
अफगाणिस्तानातील मुस्लिम धर्मगुरू हत्याकांडातील मारेकरी राहुरीत जेरबंद

बाभळेश्वर-श्रीरामपूर रोडवरील (Babhaleshwar-Shrirampur Road) विद्या विकास पब्लिक स्कू जवळील गट नंबर 120 मधील प्रशांत तबाजी म्हस्के यांच्या मालकीचा चार एकर ऊस व त्यातील ठिबक (Drip) जळून खाक झाले आहेे. उसाला आग लागताच शेजार्‍यांनी संबंधित ऊस मालकाला आग (Fire) लागल्याची माहिती दिली. पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अग्निशामक बंबला फोन करून बोलून आग विझवण्यास प्रयत्न केला. तोपर्यंत आगीने संपूर्ण उसाला वेढा घातला होता. या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी व नागरिकांच्या लक्षात येताच आग विझवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा झालेे होते.

वीज तारांचे स्पार्किंग होऊन 4 एकर ऊस भस्मसात
वाढवलेले पालिका प्रभाग, झेडपीचे गट रद्द होणार

महावितरणच्या लाबलेल्या तारांमुळे शॉटसर्किट (Short Circuit) होऊन सदरची आग (Fire) लागली. महावितरणच्या अधिकार्‍यांना फोन करून यासंदर्भात कल्पना दिली. परंतु कोणीही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. महावितरणच्या अधिकार्‍यांनी सदर घटनेस भेट देऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. एकतर शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. यावर्षी कुठल्याही शेतीमालाला योग्य असा तो भाव न मिळाल्याने शेतकरी पूर्ण हतबल झालेला आहे. त्यातच अशा घटना घडत असल्यामुळे शेतकर्‍यांनी न्याय कोणाकडे मागायचा असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. तसेच महसूल खात्याचे अधिकारी व संबंधितांना सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे.

वीज तारांचे स्पार्किंग होऊन 4 एकर ऊस भस्मसात
शिक्षक पात्रता परीक्षेतील आठ हजार विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी प्रतिबंध
वीज तारांचे स्पार्किंग होऊन 4 एकर ऊस भस्मसात
शिक्षकच करतो मुलींशी अश्लिल वर्तन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com