बाभळेश्वरच्या हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर छापा

बाभळेश्वरच्या हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर छापा

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

बाभळेश्वर येथील हॉटेल यमुना लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली. तसेच दोन आरोपी ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग येथे मालक प्रवीण बाळासाहेब पानसंबळ हा महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या सुचनेप्रमाणे डीवायएसपी संदीप मिटके, डीवायएसपी संजय सातव, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर शहर आयुष नोपाणी, अभिनव त्यागी, स.पो.नि. समाधान पाटील व कर्मचारी यांचे पथक तयार करुन हॉटेल यमुना लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवून शासकीय पंचासमक्ष छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली.

आरोपी प्रवीण बाळासाहेब पानसंबळ, रा. निर्मळ पिंपरी ता. राहाता, अरबाज मोहंमद शेख, रा. बाभळेश्वर यास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुध्द लोणी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे भा. दं. वि. कलम 370 सह स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com