बाभळेश्वरमध्ये राहात्यातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू

एक्साईज म्हणजे अपघात; घातपाताचा नातेवाईकांचा संशय
बाभळेश्वरमध्ये राहात्यातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू

राजुरी |वार्ताहर| Rajuri

दारु उत्पादन शुल्क विभागाच्या ( Department of Liquor Excise) ताब्यात असलेल्या एका आरोपीस (One accused) श्रीरामपूरच्या कारागृहातून (Shrirampur Jail) राहाता न्यायालयात (Rahata Court) नेत असताना बाभळेश्वर (Babhaleshwar) येथे थांबले होते. आरोपीस लघुशंकेसाठी पोलीस बाभळेश्वर चौकातून घेऊन जात असताना एका कंंटेनरचा धक्का लागल्याने आरोपी मागील चाकाखाली येवून त्याचा मृत्यू (Death)झाला, असल्याचे म्हणणे एक्साईजचे पोलिसांचे आहे. तर हा घातपात असल्याचा संशय आरोपीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात (Loni Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने (Squad of the Excise Department) राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) काही गावांमध्ये छापे टाकून चार आरोपींना पकडले होते. या आरोपींना श्रीरामपूर येथील कारागृहात ठेवले होते. काल त्यांना राहाता न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस या आरोपींना घेऊन जात असताना बाभळेश्वर येथील यमुना हॉटेलच्या (Yamuna Hotel) खाली असणार्‍या एक्साईजच्या ऑफिसमध्ये आरोपींंना आणण्यात आले होते. यातील जनार्धन चंद्रया बडिवार (वय 46) रा. राहाता आरोपीस लघुशंकेसाठी पोलीस (Police) बाभळेश्वर चौकातून घेऊन जात असताना एका कंटेनरचा धक्का लागल्याने आरोपी बडिवार हा मागील चाकाखाली येवून जागीच ठार झाला.

ही घटना झाल्यानंतर नगर मनमाड रोडवर एकच धावपळ उडाली. यानंतर अर्धा तास या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. यानंतर लोणी पोलीस स्टेशनच्या मदतीने वाहतूक सुरळीत करून हा मृतदेह लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलला पाठविण्यात आला. या घडलेल्या घटनांमुळे दारु उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. या घटनेनंतर लोणी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांचा आरोप

सदर घटना बाभळेश्वर हद्दीमध्ये घडली असून मृतांच्या नातेवाईकांनी घातपात केल्याचा आरोप राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यावर केला आहे. सदर घटनेचा अधिक तपास लोणी पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे तसेच माझ्या मेव्हण्यावर खोटा गुन्हा दाखल करून घातपात केला आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी मयत जनार्दन बंडीवार यांचे मेहुणे रवींद्र तालापल्ली यांनी केली. राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘चिरीमिरी’ दिली नाही म्हणून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचाही दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची लवकरच समोरील असे वक्तव्य शिर्डी विभागाच्या डीवायएसपी संजय सातव यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com