बाबर्डीतील खून अनैतिक संबंधातूनच

दोन संशयित श्रीगोंदा पोलिसांकडून जेरबंद
बाबर्डीतील खून अनैतिक संबंधातूनच

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील बाबर्डी येथील एका 65 वर्षीय व्यक्तीचा झालेला खून अनैतिक सबंधातून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून या प्रकरणी श्रीगोंदा पोलीसांनी दोघांना जेरबंद केले आहे.

अमोल आप्पा कुरुमकर (28) व अक्षय नानासाहेब वागस्कर (23,दोघे रा. वडाळी ता. श्रीगोंदा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर दशरथ साहेबराव शिर्के (65, रा. शिरसगांव बोडखा, ता. श्रीगोंदा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी दशरथ शिर्के यांचा खून झाला होता. त्यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादी प्रमाणे जमीनच्या वादातील दोघांची चौकशी केली.

मात्र श्रीगोंदा पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत सदरप्रकरण अनैतिक संबंधातुन अमोल कुरुमकर आणि अक्षय वागस्कर या दोन जणांनी हा खून केल्याचे उघड केले. पोलीसांनी तपासाचे सूत्र फिरवत तांत्रीक तपासाच्या मदतीने व गुप्त बातमीदाराकडून मिळाल्या माहिती नुसार अमोल कुरुमकर व अक्षय वागस्कर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अनैतिक संबंधातुन संगनमताने दशरथ शिर्के यांचा खुन केल्याची कबुली दिली आहे.

सदर कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, कर्मचारी समीर अभंग, श्री ढवळे, विट्टल बडे, गणेश गाडे, अमोल कोतकर, रविंद्र जाधव, प्रताप देवकाते, गणेश साने, प्रशांत राठोड यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com