स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : कोपरगाव शहरात शासकीय कार्यालयांवर आकर्षक विद्युत रोषणाई

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : कोपरगाव शहरात शासकीय कार्यालयांवर आकर्षक विद्युत रोषणाई

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे.

त्यापार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात विविध उपक्रम राबविले जात असून शहरातील तहसिल कार्यालय, कोपरगाव नगरपालिका कार्यालय, नगरपालिका वाचनालय इमारत, शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे या सर्व शासकीय कार्यालयातील इमारतींना आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या तिरंगी रोषणाईमध्ये परिसर रोषणाईने उजळून निघाला.

तसेच शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिव श्रुष्टि स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक त्याच प्रमाणे कोपरगाव पिपल्स को ऑप बॅंक, समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह गांधी चौक शाखा, ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देखील आकर्षक विद्युत रोहणाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com