जुलमी इंग्रज राजवटीशी झुंजणारे वाघ!

जुलमी इंग्रज राजवटीशी झुंजणारे वाघ!

अहमदनगर (प्रतिनिधी)

१८२६ मध्ये राघोजी भांगरे व बापू भांगरे यांच्या नेतृत्वात भारतीय क्रांतीची मशाल अधिकच तीव्र झाली. मायभूमीला मुक्त करण्याची शपथ घेतली गेली. त्यानंतर इंग्रजांना राघोजी यांनी सुळो की पळो करून सोडले. तत्पूर्वी शिंदे-होळकर-भोसले- गायकवाड या मराठेशाहीच्या स्तंभांना इंग्रजांविरोधात एकत्रित आणण्यासाठी धडपडणारे सरदार त्रिंबक डेंगळे हे मराठेशाहीतील धाडसी वाघ होते. ब्रिटिशांविरुद्ध गुप्तपणे फौजेची जमवाजमव करणारे सरदार डेंगळे इंग्रजांना धूळ चारत राहिले.

ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे भांगरे

पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले याच काळात ब्रिटिशाना सळो की पळो करून सोडणाऱ्या आदिवासी महादेव जमातीच्या बडखोरांनी व त्याच्या नायकानी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले परकीय सत्तेशी प्राणपणाने लढणारा याच परंपरेतील सह्याद्रीचा वाघ म्हणून राघोजी भांगरे याचा दबदबा मोठा होता. अकोले तालुक्यातील देवगाव येथे ८ नोव्हेंबर १८०५ रोजी राघोजी भांगरेचा जन्म झाला आदिवासी महादेव कोळी जमातीतील आई रमाबाई व वडील रामजी यांच्या पोटी जन्म झाला वडील ब्रिटिश सरकारच्या दरबारी सुभेदार म्हणून नोकरी करत होते परंतु, ब्रिटिशानी १८१८ साली मराठा सैन्यास हरविले त्यानंतर महादेव कोळ्यांच्या सह्याद्रीतील किल्याच्या वतनदाऱ्या काढल्या त्यामुळे परपरागत अधिकार काढल्याने महादेव कोळ्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. एकदा कोकणात दरोडा पहला त्याचा आरोप राघोजींच्या वडिलांवर लावण्यात आला परिणामी पोलिसांनी राघोजींच्या घरच्यांचा अतोनात छळ केला यावर राघोजीने राजूर प्रातातील पोलिस अधिकारी अमृतराव कुलकर्णी याची भेट घेऊन छळ थाबविण्यास सागितले. त्यातूनच दोघामध्ये बाचाबाची झाली रागाच्या भरात राघोजीने मुडक तोडून एका कोपऱ्यात ठेवले धाडसी राघोजीला कुणीही अडवण्यात धजावले नाही. त्यानंतर १८२६ मध्ये राघोजी भांगरे व बापू नागरे याच्या नेतृत्वात क्रांतीची मशाल अधिकच तीव्र झाली. मायभूमीला मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यानंतर प्रजाना राघोजी यांनी सुळो की पळो करून सोडले.

मराठेशाहेतील धाडसी सरदार

ब्रिटिशाविरुद्ध सर्वप्रथम मराठी मुलुखात उठाव घडवून आणणारा, मराठेशाहीला एकत्र आणण्यासाठी धडपडणारा, अगभूत कौशल्य, धाडसी वृत्ती स्वीकारलेल कोणतही काम तडीस नेण्याचा स्वभाव असे सगळे गुण संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील धाडसी बाघ सरदार त्रिंबक डेंगळे यांच्यात होते. न. चिं. केळकर आपल्या मराठी व इंग्रजी या पुस्तकात डेंगळे यांच्या विषयी लिहितात, बाजीरावास पुष्कळ कुटिल मंत्री होते, पण त्रिंबक डेंगळे हे श्रेष्ठ होते. डेंगळे यांनी स्वतःच्या राजकीय आयुष्याची पर्वा न करता पेशवाई वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता त्याचबरोबर शिंदे होळकर-भोसले- गायकवाड या मराठेशाहीच्या स्तमाना एकत्रित आणण्यासाठी धडपडणारे सरदार डेंगळे हे होते. इग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या तुरुंगातून पळणारेही डेंगळे हेच होते ब्रिटिशांविरुद्ध गुप्तपणे पेशव्यासाठी फौजेची जमवाजमव करणारे तसेच धुळकोटला अखेरपर्यंत पेशव्याची साथ न सोडणारे डेंगळे महाराष्ट्राला फारसे ज्ञात नाही परंतु डेंगळे महाराष्ट्राला कळाले झेप या ना स इनामदार यांच्या कादबरीमुळे डेंगळे यानी स्वतः भिल्ल जमातीत जाऊन त्यांना जुलमी ब्रिटिश सरकारविरुद्ध उठवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे सुमारे ८००० मिल्लांनी खानदेश व बागलाण भागात इंग्रजाविरुद्ध उठाव केला पुढे डेंगळे साताऱ्याकडील रामू महादेवाच्या डोंगररांगात येऊन तेथे फौजेची जमवाजमव करू लागले इंग्रजानी त्याच्यावर दोन लाखाचे बक्षीस ठेवले त्याचबरोबर एक हजाराचा इनामगाव असे अनेक जाहीरनामे काढले परंतु, ते इग्रजाना धूळ चारीत राहिले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com