आयुषी खेडकरने पाथर्डीचे नाव देशात मोठे केले

भारतीय वायुसेनेत पायलट पदावर निवड झाल्याबद्दल पाथर्डी तालुक्याचा सन्मान
आयुषी खेडकरने पाथर्डीचे नाव देशात मोठे केले

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

आयुषी खेडकर (Ayushi Khedkar) हिने मिळविलेले यश असामान्य असून पाथर्डीचे (Pathardi) नाव देशात मोठे केले. हा क्षण पाथर्डी तालुका व नगर जिल्ह्यासाठी (Ahmednagar District) अभिमानाचा, स्वाभिमानाचा व भाग्याचा आहे. तिच्या यशामुळे दिवाळी साजरी केल्याचा आनंद होतोय. आयुषीची प्रेरणा (Motivation) घेऊन अनेक आयुषी तयार होऊन पाथर्डीचे नाव राज्यात, देशात आणखी मोठे करतील, असे प्रतिपादन आ. मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांनी व्यक्त केली.

तालुक्यातील आयुषी खेडकर (Ayushi Khedkar) हिची भारतीय वायुसेनेत पायलट (Pilot in the Indian Air Force) पदावर निवड झाल्याबद्दल पाथर्डी तालुक्याच्यावतीने लोकनेते आप्पासाहेब राजळे सभागृहात जिल्हा पोलीस अधीक्षक (SP Manoj Patil) यांच्याहस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभापती सुनीता दौंड, डॉ. नितीन खेडकर, डॉ. मनीषा खेडकर, चंदाबाई खेडकर, अथर्व खेडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उध्दव वाघ, दिनेश लव्हाट, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक प्रवीण राजगुरू, अमोल गर्जे, विष्णूपंत अकोलकर, सोमनाथ खेडकर, रामकिसन काकडे, मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, बंडू पठाडे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

आ.राजळे (MLA Monika Rajale) म्हणाल्या, एकेकाळी पाथर्डी (Pathardi) तालुक्याची ओळख कायम दुष्काळी तालुका (Drought taluka) म्हणून होती. ती आता पुसत असून तालुका आता अधिकार्‍यांचा तालुका म्हणून राज्यभर, देशभर ओळखला जात आहे. तालुक्यातील अनेक सुपुत्र केंद्र व राज्य प्रशासनातील बड्या पदावर कार्यरत आहेत. मुंबई, दिल्ली, नागपूरमध्ये भेटतात त्यावेळी समाधान वाटते. त्यातच आयुषीने घेतलेली गरुडझेप तालुक्यासाठी मोठा सन्मान असून तिचे कर्तृत्व असेच बहरत राहावे. जिल्हा पोलीसप्रमुख पाटील (SP Manoj Patil) म्हणाले, मला पोलीस व संरक्षणदल यापैकी संरक्षण दलाबद्दल प्रचंड आदर आहे. संरक्षण दल श्रेष्ठ असून त्यामध्ये देशसेवा करण्याची संधी मिळते.

आयुषीने जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन वायुसेनेत पायलट होता येते हे सिध्द केले आहे. मुलीला कोणतं क्षेत्र निवडायचं याचं स्वातंत्र्य पालकांनी तुला दिलं असे स्वातंत्र्य देणारे पालक खुप कमी आहेत. अमेरिकेतील कुठल्याही विद्यापिठात तुला प्रवेश मिळाला असता मात्र तू देशसेवेला प्राधान्य देऊन धाडसी क्षेत्र निवडलं. तुझ्या या धाडसाचं कौतुक वाटतं. तुला बघून तुझी प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील मुलींचा आत्मविश्वास वाढणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरूषी खेडकर हिने आपल्या यशस्वी प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केले तर आभार नगरसेवक रमेश गोरे यांनी मानले.

यावेळी आयुषीचा नगरपालिका, खरेदी विक्री संघ, जि.प.प्रा.शाळा, मोहटादेवी देवस्थान, मढी देवस्थान यांच्यासह तालुक्यातील विविध शिक्षण संस्था, स्वंयसेवी संस्था, ग्रामपंचायती, भारतीय जनता पक्षासह इतर राजकीय पक्षांनी तसेच विविध गावांच्या ग्रामस्थांनी सत्कार केला.

यावेळी आयुषीचा नगरपालिका, खरेदी विक्री संघ, जि.प.प्रा.शाळा, मोहटादेवी देवस्थान, मढी देवस्थान यांच्यासह तालुक्यातील विविध शिक्षण संस्था, स्वंयसेवी संस्था, ग्रामपंचायती, भारतीय जनता पक्षासह इतर राजकीय पक्षांनी तसेच विविध गावांच्या ग्रामस्थांनी सत्कार केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com